येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क करा.

Breaking

6/recent/ticker-posts

आणि राज ठाकरे यांचा गाठीभेटी कार्यक्रम ऐनवेळी रद्द

Raj Thackeray


मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी पुणे येथे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटीचं आयोजन केलं होतं. मात्र ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. याबतातची माहिती पुणे येथील मनसेचे नेते बाबू वागस्कर यांनी दिली.


राज ठाकरे यांना भेटण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यासोबत एक व्यक्ती आला तरी या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला येणाऱ्यांची संख्या शंभर ते दीडशे होईल अशी शक्यता निर्माण झाली होती. 


त्यामुळे गाठीभेटी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं वागस्कर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. तसेच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पुण्यात मोजक्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला जाईल. या मेळाव्याला मनसे अध्यक्ष उपस्थित असतील असं वागस्कर यांनी सांगितलं.


नियोजित कार्यक्रमानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे सकाळी मुंबईहून निघाले आणि ते पुण्यात पोहचले. पुण्यामध्ये नवनियुक्त ४५ पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचं वाटप आणि आजी-माजी नगरसेवकांच्या भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 


मात्र विभागीय आयुक्त आणि पालक मंत्री अजित पवार यांनी जी बैठक घेतली त्यानंतर त्यांनी आवाहन केलं आहे शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात यावीत तसेच गर्दी टाळावी. पुण्यामध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. 


याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी एवढ्या लोकांना एकत्रित बोलवून पत्रं देणं योग्य दिसणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळले गेले पाहिजेत. म्हणूनच या भेटीगाठींचं नियोजन रद्द करण्यात आलं आहे, अशी माहिती वागस्कर यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या