येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क करा.

Breaking

6/recent/ticker-posts

56 इंच छातीला स्पर्श करीत 'ममत्त्वाची' लढाई

56 इंच आणि दीदीचे राजकारण

mamta banerjee road show


सध्या भारताच्या राजकारणामध्ये सर्वाधिक चर्चा पश्चिम बंगालच्या निवडणुकीची सुरू आहे. एकेकाळी डाव्यांचा गड असणाऱ्या अभेद्य किल्ल्याला धक्का देण्याचं महत्त्वाचं कार्य ममतादीदींनी केलं. 


या ठिकाणी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि इतर पक्षांची दाळ मात्र शिजली नाही, परंतु ग्राऊंड स्तरावर काम करताना ममतादीदींनी बंगाली माणसाच्या मनामध्ये निर्माण केलेली आपुलकीची भावना आजही ममत्वाने फुलून येत आहे. 


mamta banerjee rally


एकीकडे देशाच्या राजकारणातील बदलती समीकरणे लक्षात घेता सध्या नरेंद्र मोदींच्या सरकारने भारताच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल करीत हजारो वर्षाच पीक जसेच्या तसे राहावे याकरिता बांधणी सुरू केली आहे. 


काँग्रेसमुक्त चा नारा देणाऱ्या भारतीय जनता पार्टीने बऱ्याच राज्यांमधून काँग्रेसला हद्दपार केल आहे, असे असतानाही पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये यावेळी वामपंथी दल आणि काँग्रेसने निवडणुकीच्या संदर्भामध्ये वैचारिक मंथन आणि बदलती समीकरणे या दोन गोष्टी वास्तववादी स्वीकारायला पाहिजे होत्या. 


परंतु शत्रू कोण आणि मित्र कोण याची ओळख न ठेवता फक्त राजकीय वैरत्व व आणि महत्त्वाकांक्षा या दोन गोष्टी उराशी ठेवून बंगालच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय जरी घेतला तरी ममतादीदीला भारतीय जनता पार्टी कडून जास्त धोका नाही परंतु वामपंथी आणि काँग्रेस मुळेच ममतादीदी ला धक्का बसू शकतो. 


वास्तविक पाहता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण दुव्यांनी यांनी ममतादीदी ला सपोर्ट केला आहे. एक आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हिरो शरदचंद्र पवार आणि दुसरे महत्त्वपूर्ण राजकीय नायक संजय राऊत या दोघांनीही ममता दीदीच्या  ममत्वाला ओळखीत बंगालच्या राजकारणामध्ये आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 


mamta banerjee


परंतु येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला याचा कितपत फायदा होईल हे सांगण्यापेक्षा,  एका महिलेने भारतातील राजकीय सर्वशक्तिमान पुरुषाला आव्हान देत बंगालच्या राजकारणा मधील झेंडा फडकत ठेवला हा इतिहास मात्र विसरला जाणार नाही. 


वास्तविक पाहता येणाऱ्या काळामध्ये होणारे राजकीय बदल हे प्रत्येक माणसाला जिव्हारी लागणारे आहे. कारण राजकारणातील महत्त्वाकांक्षा फक्त खुर्ची पुरती मर्यादित राहिली आहे. लोकांच्या समस्या सोडविणे कोसो दूर राहिले आहे. त्यामुळे येत्या काळात लोकशाहीचे धिंडवडे काढणाऱ्या माणसाचाच गवगवा केल्या जाईल. 


mamta banerjee social distancing


परंतु लोकशाहीचा पाया पक्का करणार्‍या माणसांना शेवटी समाज माध्यमांवर ती आपली प्रतिक्रिया देण्याच्या पलीकडचं वास्तव्य शिल्लक राहणार नाही. त्यामुळे बंगालच्या राजकारणात होणारा अमुलाग्र बदल आणि ममत्वाचा फडकणारा बंगालच्या राजकारणातला महत्त्वपूर्ण झेंडा हा देशाच्या तमाम नागरिकांना शतकाचं  राजकारण देऊन जाईल.


" माणसांच्या भावना ह्या राजकीय क्षेत्र पुरता मर्यादित न राहता भविष्यातील पिढीसाठी प्रेरणादायी राहाव्यात याकरिताच ममत्वाची बंगालमध्ये सुरू  असणारी लढाई आजी सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या लढाईचा नायक आणि खलनायक कोण राहिल हा येणारा काळच ठरवणार आहे"


" देश रसातळाला जात असताना काँग्रेसच्या भूमिका सातत्याने चुकीच्या मार्गाने जात आहेत असे राजकीय वैचारिक मंथन सुद्धा देशांमध्ये सुरू आहे वास्तविक पाहता बंगालला मायेचा आणि महत्वाचा हात देण्याचं महत्त्वाचं कार्य काँग्रेस आणि वामपंथ यांनी करायला पाहिजे होतं. असे असतानाही एकला चलो रे ची भूमिका घेणाऱ्या ममता ची राजकीय कारकीर्द मात्र रणरागिनी सारखी देशांमध्ये प्रसिद्ध राहील"


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या