येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क करा.

Breaking

6/recent/ticker-posts

युवकांनो आर्थिक लढाईच्या चळवळीत सक्रीय व्हा - डॉ. हर्षदीप कांबळे

IAS Harshdeep Kamble

भगवान बुद्ध म्हणाले, 'केवळ एखादी गोष्ट मी तुम्हाला सांगतो म्हणून ती सत्य असली पाहिजे, असे तुम्ही बिलकुल मानू नका, ही गोष्ट तुमच्या विचारशक्तीला तर्कशक्तीला पटत असेल तरच तुम्ही स्वीकारा, नाहीतर तुम्ही खुशाल टाकून द्या! 


या आशियाने बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांचे हेच म्हणणे होते ते म्हणतात की, प्रत्येक मनुष्याला विचार स्वातंत्र्य आहे,आणि आपल्याला लाभलेल्या विचार स्वातंत्र्याचा उपयोग सत्याचा शोध घेण्यासाठी केला पाहिजे. 


जरी सत्याचा शोध घेण्याचा मार्ग बिकट असला तरी ,सर्व मानवात विवेकशक्ती आणि सद्सद्विवेकबुद्धी लाभली आहे. या दोन्ही महामानवांनी आपल्या कर्तृत्वाच्या प्रकाशाने येणारा कालखंड उजळून टाकला आहे.


जगात झालेल्या सर्व क्रांत्या या युवकांनी केल्या आहेत. आणि परिवर्तनाची सत्ताकेंद्र हे युवकच आहेत. युवकांनी मनात ठेवून कार्यप्रवण प्रक्रिया सक्रिय केली तर, जगामध्ये परिवर्तन शक्य आहे. जग आज कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहे याची कल्पना आपणास आली असेलच, हे नवीन सांगण्याची काही बाब नाही. 


मी माझ्या आयुष्यातला घेतलेला अनुभव आणि माझ्या समोर असलेल्या समस्या यावर चिंतन करत असतांना महत्त्वपूर्णरित्या माझ्यासमोर या देशातला युवक राहिला आहे. जो परिवर्तनाच्या चळवळीमध्ये सक्रिय राहू शकतो. आणि तो परिवर्तन घडवून आणू शकतो. नवनवीन संकल्पना आता आधुनिक काळात जन्माला येत आहेत. 


हे आपल्याला नाकारता येणार नाही.कारण येणारा काळ हा संगणकाशी मैत्री करणारा आहे. ती मैत्री तुम्हाला आजन्म तुम्हाला टिकून ठेवायची आहे. कारण पारंपरिकता सोडून नवीन युगामध्ये वाटचाल करीत असताना, तुमची आर्थिक बाजू भक्कम असायला पाहिजे. 


तर तुम्हाला आता आर्थिक प्रगतीच्या लढाईमध्ये सक्रिय व्हावे लागेल. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात सर्वात महत्त्वाचे बदल होत आहेत. हे बदल आता आर्थिक क्षेत्रामध्ये होत आहेत. 


पारंपारिक बाराबलुतेदार आणि अठराअलुतेदार पद्धतीने गावाच्या गरजा गावातच पूर्ण व्हायच्या ही संकल्पना त्यावेळी उपयुक्त होती आणि आजही आहे. परंतु आता आपल्याला त्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे. अर्थशास्त्र हा मानवी जीवनाचा आरसा बनला आहे. तो आपणास चेहरा सदैव दाखवित असतो. म्हणूनच जगातील सर्व चक्र अर्थ या संकल्पनेमध्ये दडलेले आहे.


 सुजनहो आजपासून माझ्या अनुभवातून मी आपणास स्पष्ट सांगू इच्छितो की, जेवढ्या सामाजिक लढाया आपण पोटतिडकीने लढत आहोत, त्यापेक्षा हजारपट लढाया आपण आर्थिक चळवळी करिता लढल्या पाहिजेत, असे माझे ठाम मत आहे .आणि हे लक्षात ठेवा आता काळानुरूप संदर्भ बदलत चालले आहेत.


प्रागैतिहासिक काळात ग्राम स्वयंपूर्ण होते तसे तुम्ही असले पाहिजेत. त्यावेळी बारा बलुतेदार व अठरा अलुतेदार पद्धतीने स्वयंपूर्णता आणली होती याला स्वयंचलित अर्थशास्त्राचा सिद्धांत महत्त्वाचा म्हटल्या जाते. आणि तो सिद्धांत बुद्धाच्या काळा मध्येच मांडल्या गेला आहे.


आपण आणि आपल्या पूर्वजांनी आर्थिक बाबतीमध्ये केलेला संघर्ष आपणास विसरता येणार नाही. बुद्धाच्या काळात असलेली बचतीची संकल्पना ही आजच्या बचत गटाचा आदर्श आहे. लढाईनंतर राज्याचा खजिना संपला हे लक्षात आल्यानंतर घरच्या शेकडो आणि हजारो महिलांनी राजांना आपल्या बचतीचा पैसा देणे आणि राज्य सुरक्षित करणे ही संकल्पना आज बचत गटाचा आदर्श असल्याचे उदाहरण  बुद्ध काळातील अर्थव्यवस्था निश्चितपणे  यशस्वी होती. 


या काळामध्ये किती सुंदर आणि सूचक  व सुसज्ज अर्थव्यवस्था होती याची कल्पना आपल्याला येते. म्हणजेच युवा ,महिला आणि अर्थ हे तिन्ही घटक आपल्या उन्नतीला कारणीभूत आणि कायदेशीर ठरलेली आहेत, हे विसरता येणार नाही.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिभेतून निघालेली आर्थिक क्रांतीची सूत्र ही मानव कल्याणाची सर्वांनी सूत्र आहेत ती काळाची गरज आहे. युवकांनो, आज मी तुम्हाला आर्थिक चळवळीमध्ये सक्रिय व्हा! यासाठीच सांगत आहे  की,येणारा काळ हा तुम्हाला व्यावसायिक दृष्टिकोनातून तुमच्या डोक्यामध्ये ठेवावा लागणार आहे. 


देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात मध्ये असणाऱ्या युवकांना नोकर्‍या मिळतील याची खात्री आज राहिलेली नाही. कारण जग एका सूत्रांमध्ये बांधला गेलेला आहे. त्यामुळे व्यवसाय हा आपल्या कुटुंबाचा देशाचा महत्त्वाचा घटक ठरणार आहेत. मी आज आर्थिक राजधानीमध्ये वास्तव्य करतो म्हणजेच मुंबईमध्ये. 


मुंबईमध्ये कधीच रात्र झालेली मला दिसली नाही. हे शहर कधीच झोपत नाही. ही संकल्पना मी माझ्या डोळ्याने बघत आहोत प्रत्येक जण हा चालणारा आहे. त्यामुळे थांबणारा माणूस कधीच प्रगती करत नाही त्याला आपल्या पायाला गती द्यावी लागते. अशीच गती युवांनो तुम्हाला तुमच्या मेंदूला द्यावी लागेल. 


जोपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये संशोधनाची प्रक्रिया येत नाही,तोपर्यंत काही करण्याची प्रक्रिया येत नाही.म्हणेजेच उद्योगाची प्रक्रिया येत नाही, तोपर्यंत तुम्हाला उन्नतीचा मार्ग कसा शोधता येईल ?त्यामुळे तुमच्या उन्नतीचा मार्ग हा तुमच्या मध्ये दडलेला आहे. फक्त त्याला  मी मोटिवेशन करावं हीच माझी यावेळी प्रामाणिकपणे इच्छा आहे. तुम्हाला आठवत असेल की, भारत हा जगातला सर्वात श्रीमंत देश आहे, सोन्याचा धूर निघणारा देश आजही वैचारिक दृष्टिकोनातून श्रीमंतच आहे. तथागत भगवान बुद्धाचे समतेचे विचार हे आजही तेवढेच जगाला आकर्षित करीत आहे. 


जग आज आपल्याकडे आशा आणि अपेक्षेने बघते, ती अपेक्षा आणि आशा तुम्हाला पूर्ण करावयाची आहे. अवघ्या चोविसाव्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जगाचे अर्थशास्त्र सापडले, ते कसे तर," ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनल ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी" म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन आणि अर्थसूत्र याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात एम. ए. या पदवीसाठी अवघ्या चोविसाव्या वर्षी एक शोधनिबंध लिहिला होता. त्यावेळी आपणास लक्षात आले असेल की, बाबासाहेबांचा अर्थशास्त्र या विषयावर प्रचंड प्रमाणामध्ये भर होता.  


1925 ला टाकलेले पहिले अर्थक्रांती तील महत्त्वाचे पाऊल होते. म्हणूनच आज आपल्याला त्याचं अध्ययन आणि अनुकरण या दोन्ही गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्या शिवाय आपल्याकडे पर्याय राहणार नाही. बाबासाहेब त्यापलीकडे एक गोष्ट आपणास सांगतात की, पैसा उभारणे आणि खर्च करणे यात काही गोष्टींच्या पलीकडे आर्थिक जबाबदारी  स्वीकारावी लागणार आहे. हे आवर्जून आपणास सांगितल्या गेलेल्या आहेत. म्हणूनच युवकांनो, तुम्हाला या सर्व बाबींकडे  चिकित्सक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे.


माझ्या प्रशासकीय अनुभवातून मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो की,माझ्या संपर्कात आलेल्या शेकडो युवकांनी उद्योगाच्या संदर्भामध्ये माझ्याशी चर्चा केल्यात, काही प्रोजेक्ट सुद्धा मला दाखविले त्यापैकी यांनी पोटतिडकीने चिकित्सक बुद्धीने आणि जिद्दीने हे उद्योग सुरू केलेत. ते आज उद्योगांमध्ये यशस्वी झालेले आहेत. 


त्यांचा उद्योग सुद्धा चांगल्या प्रकारे सुरू आहे. मी बऱ्याच उद्योगांना सुद्धा भेटी दिलेल्या आहे. महिला बचत गटाच्या संकल्पना सांगत असतांना मला आवर्जून तुम्हाला सांगावसं वाटते की,  क्रांती करण्यासाठी महिलांचा सिंहाचा वाटा आहे, तसाच उद्योगांमध्ये सुद्धा महिला सिंहाचा वाटा उचलत आहेत. आणि प्रामाणिकपणे उद्योग सुद्धा करीत आहेत. याचा मला आनंद झाला आहे.आणि आदरही आहे. 


त्याचं कारण की, आंदोलन आणि आर्थिक आंदोलन या दोन्ही घटकांमध्ये महिलांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. ही भूमिका निवडताना माझ्यासमोर युवा आणि महिला या दोन्ही गोष्टी तेवढ्यात महत्त्वपूर्ण राहिल्या आहे. ज्या गोष्टींचा आजही मी आदर करतो आणि सन्मान सुद्धा करतो.


युवकांनो,  ते आव्हान स्वीकारणे हे आपल्याला तेवढेच महत्त्वाचे आहे.जे व्यक्ती आव्हान स्वीकारत असतात ते यशस्वी होतात.  जर यशस्वी झाले तर तुम्ही उन्नतीच्या मार्गावर जाणार हे निश्चितपणे मला माहित आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण उद्योगशील झाले पाहिजे. उद्योगांमध्ये आपण गुंतला नंतर जगाशी आलेला आपला संपर्क हा तुम्हाला स्वतःची ओळख करून देणारा असतो. 


आज जग मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये समोर जात आहे म्हटलं जातं की, एखाद्या वेळेस आपल्याकडे असलेली वस्तू विकायची असेल तर त्या वस्तूची मार्केटिंग करणं तेवढेच गरजेचे आहे. परंतु आपण कुठे कमी पडतो हे मात्र आपण कधीच बघत नाही. त्यामुळे उद्योग क्षेत्रांमध्ये वावरत असताना आपण  काही वजाबाकीचे गुण सुद्धा तपासुन घेतले पाहिजेत. ज्या रस्त्याने जात असतो तो रस्ता योग्यच आहे का? याची खबरदारी ज्याप्रमाणे आपण घेतो ती खबरदारी उद्योगांमध्ये सुद्धा घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये आणि उद्योगांचे जाळे पसरलेले आहेत. 


मी उद्योगाचा आयुक्त म्हणून अनेक उद्योगाच्या आणि लघुउद्योग कर्त्याच्या  संपर्कात आहोत. मला  तुम्हाला सांगावं वाटतं की, यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुका मध्ये असणाऱ्या काही महिलांनी गारमेंट सुरू करान्या याबाबत प्राथमिक चर्चा माझ्यासोबत केली होती. त्या प्राथमिक चर्चेला मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला सहभागी होता आलं, तो उद्योग यशस्वीपणे सुरू आहे. आणि भटक्या समाजामध्ये असणाऱ्या बंजारा समाजाच्या महिलांनी एकत्र येऊन कस्टलचे जाळे उभारणे हा माझ्यासाठी सर्वात चांगला  अनुभव मी मानतो.


असे अनेक उदाहरणे तुम्हाला देता येईल, मी आज फेसबुकवर तुमच्या सोबत संवाद साधत आहोत. तो संवाद साधण्याचा प्रामाणिक हेतू हाच आहे की, आपण उद्योग क्षेत्रामध्ये सक्रिय झाले पाहिजे. मला शेकडो फोन येतात, शेकडो कॉल येतात. प्रत्येकाच्या फोन ला उत्तर देऊन त्यांनी काय करावं याबाबत मी निश्चितपणे त्यांच्याशी शेअर करत असतो. 


बरेच अनुभव सुद्धा त्यांच्याशी शेअर करताना मला भविष्यातील येणाऱ्या पिढीची तेवढी चिंता आहे. मित्रहो, येणारा काळ आव्हानात्मक आहे, त्याला तुम्ही निश्चितपणे तोंड देणार आहात. तुमच्यामध्ये ती विचारक्षमता आहे.वैचारिक दृष्टिकोनातून प्रगल्भ असणारी माणसं कधीही लढाईत पराभूत होत नाही. 


हा आदर्श आपल्याला महापुरुषांनी दिलेला आहे. त्या आदर्शाचे आज आपल्याला अवलोकन आणि पालन करायचे आहे. याच बाबतीमध्ये मी तुमच्याशी अनेक बाबतीमध्ये संवाद साधणार आहे. तुम्ही यशस्वी  उद्योगकर्ते व्हायला पाहिजे आणि आपल्या समाजाचं, राज्याचं ,देशाचं जबाबदारी स्वीकारा हीच अपेक्षा यावेळी मी तुमच्याकडून करतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या