येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क करा.

Breaking

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी चे संगीत महाराष्ट्रात गाजणार

मुंबई प्रतिनिधी: वैशाली माडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे लवकरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या 31 मार्चला मुंबई मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये सुप्रसिद्ध गायिका माडे खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार आहेत.


vaishali made विशेष म्हणजे त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्षपद दिल्या जाणार असल्याची खात्रीलायक माहिती बाबासाहेब पाटील यांनी नुकतीच मुंबई येथे दिली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस ने आता कलावंत आणि इतर महत्त्वपूर्ण असणाऱ्या प्रसिद्ध व्यक्तींना राष्ट्रवादी प्रवेश देण्याचे सत्र सुरू केले असून काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रिया बेर्डे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भातील कलाकारांना पक्षाची जोडण्याची धोरण आखले असून त्यातलाच एक भाग म्हणून तीन वैशाली माडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.


 वैशाली माडे हा वैदर्भीय मातीतील असून वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट च्या आहेत.


 सर्वसामान्य कुटुंबामधील मुलगी नामांकित गायिका झाली. असा त्यांचा सांस्क्रुतिक प्रवास् असून त्यांनी दूरचित्रवाणीच्या अनेक कार्यक्रमांमधील विजेतेपद पटकावले आहे. मागच्या झालेल्या बिग बॉसच्या कार्यक्रमांमध्ये वैशाली माडे प्रचंड चर्चेत होत्या त्यामुळे विदर्भामध्ये सुद्धा आपल्याला पक्षाच्या दृष्टिकोनातून नवीन काही करता येईल असा दृष्टिकोन राष्ट्रवादीचा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या