येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क करा.

Breaking

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रावरची काँग्रेसची पकड सुटली

indian national congress


मुंबई:  खरतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकीकडे काँग्रेस हा दिग्गज पक्ष म्हणून ओळखला जायचा परंतु आज या पक्षाची अवस्था पाहिजे तेवढा प्रमाणामध्ये समाधानकारक नाही.


sharad pawar


या पक्षाला उभारी देणारे राजकीय धुरंदर नेते आपल्या राजकारणा पुरते मर्यादित असून भविष्यातील राजकारणाचा वेध लक्षात घेता पक्षाच्या दृष्टिकोनातून पाहिजेत तसे पाऊल उचलताना दिसत नाही. 


पक्षाच्या जबाबदाऱ्या कुणाकडे द्यायचे याबाबत पक्षाचे नियोजन कुठे चुकतंय का? याबाबतचे विचार मंथन सध्या दिल्लीमध्ये सुरू आहे. महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचं काम कोणी केलं हे सांगण्याची गरज नाही, दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वतःच आत्मचिंतन करण्याची गरज कुणाची आहे हे मात्र सांगायला वेळ नाही. 


rahul gandhi


वास्तविक पाहता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होणाऱ्या आमुलाग्र बदलाची संकेत सध्या निश्चित झाल आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या भूमिका वारंवार बदलल्या जाणार परंतु ज्या पद्धतीने काँग्रेसने महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची असणारी पकड कायम ठेवायला पाहिजे होती ती आज दिसत नाही. 


त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेसला खूप चांगले दिवस राहतील याबाबत शंका रास्ते वर्तुळामध्ये दिसून येत आहे. परंतु मागून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन महत्त्वपूर्ण पक्ष आज राज्याच्या सर्व राजकारणामध्ये आघाडीवर असल्याचे चित्र पष्ट होत आहे.त्यामुळे येणारा काळा हा कसा राहील हे मात्र निश्चित सांगता येत नाही.


महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रामध्ये सर्वाधिक अनुवाद असलेले शरद पवार येणाऱ्या काळामधल्या समीकरणाचे महत्त्वपूर्ण घटक राहणार आहे. त्यामुळे विद्यमान स्थिती बघता येणाऱ्या दहा वर्षाच्या राजकारणाची समीकरणे शरद पवार याच वर्षी पक्के करणार असल्याची खात्रीलायक माहिती राजकीय वर्तुळात मधून येत आहे. परंतु बदल मात्र निश्चित आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या