येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क करा.

Breaking

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्र्यांना लेटर बॉम्ब महाराष्ट्रात खळबळ


मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या पोलीस आणि राजकीय हे दोन महत्त्वपूर्ण चर्चा संपवायला तयार नाही.मुंबईचे निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझें प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आले आहे. 

विशेष म्हणजे या प्रकरणांमध्ये मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा वरून परमवीर सिंह यांची उचलबांगडी झाल्यानंतर त्यांनी लेटर बॉम्ब चक्क मुख्यमंत्र्याच्या हातात दिल्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता खळबळ उडाली आहे.

या लेटर मध्ये गृहमंत्र्यावर असाच आरोप करण्यात आले असून 100 कोटीच्या टार्गेटची चर्चा सध्या मंत्रालयाच्या दालनांमध्ये खूप गाजू लागले आहेत.विशेष म्हणजे राज्य सरकारने बदली केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या परमवीर सिंग यांची थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून खद खद त्यांनी महाराष्ट्राच्या जनते समोर उघड उघड मांडली.  

सचिन वाझेंना प्रत्येक महिन्याला शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते. अनिल देशमुख यांनी वाझले यांना हॉटेल,बार आणि इतर जास्त आपणाकडून एकूण शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते. मागील काही महिन्यात वाझेना गृहमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी अनेक वेळा बोलावले,त्या भेटीत हा निधी गोळा करण्याचा विषय मोठा रंगला असल्याची खात्रीलायक माहिती या पत्रामध्ये नमूद केली आहे. 

फेब्रुवारी महिन्यामध्ये गृहमंत्र्यांनी यांना बोलावून घेतले त्यावेळी गृहमंत्र्याचे दोन कर्मचारी उपस्थित होते. त्यांना महिन्याला शंभर कोटीचा टार्गेट दिले हे टार्गेट गाठण्यासाठी त्यांनी मुंबईत 1750 बार रेस्टॉरंट आणि इतर आस्थापना कडून  प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख रुपये वसुली करावी अशी सूचना देण्यात आली होती. त्यामुळे हे प्रकरण आता मोठ्या गुलदस्त्यात  जाणार आहे.

लेटरबॉम्बने खळबळ माजली. शेवटी आता मुख्यमंत्री निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय असणारे अनिल देशमुख आता हल्ली वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे, त्यामुळे पोलिस आणि राजकीय या दोन समीकरणांमध्ये अनेकांना नवीन मसाला मिळाला आहे. 

शेवटी संयमी असणाऱ्या मुख्यमंत्र्यांना बऱ्याच गोष्टीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. एकीकडे कणखर असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाने महाराष्ट्र हादरला तर दुसरीकडे संयमी असणारे व्यक्तिमत्त्व समोर अनेक राजकीय पेचप्रसंग निर्माण झाल्याने शेवटी गॉडफादर काय निर्णय घेतात यावरच आता सर्वांची नजर लागली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या