येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क करा.

Breaking

6/recent/ticker-posts

शरद पवार दिल्लीत तर देवेंद्र फडणवीस मुंबईत

शरद पवार दिल्लीत तर देवेंद्र फडणवीस मुंबईत

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजप रस्त्यावर

मुंबई 
संपूर्ण महाराष्ट्राला राजकीय वळण देणारी चर्चा सध्या मुंबई आणि दिल्लीमध्ये सुरू आहे. एकीकडे शरद पवार यांनी पत्रावरती सही नाही म्हणून परमविर सिंह यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली, तर दुसरीकडे गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या अन्यथा भाजपचे आंदोलन राजीनामा होईपर्यंत सुरूच राहील अशा दोन पत्रकार परिषदेने आज संपूर्ण महाराष्ट्र हादरला.

महाविकासआघाडी मध्ये असणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिलेला लेटर बॉम्ब अचानकपणे फुटल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये हाहाकार माजलेला आहे.


" गृहमंत्रीपद 'अनिल' चालवतात काय"
महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये चर्चा सुरू असताना गृहमंत्री पद कोण चालवतात हा प्रतिप्रश्न पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. कुठल्याही गृहखात्यावर ती चर्चा करीत असताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्तर द्यायला पाहिजे परंतु अनिल परब उत्तर देतात हे काय.


महाराष्ट्रातील सरकारला धारेवर धरीत असतानाच एकीकडे गृहमंत्र्यांच्या विरोधामध्ये जिल्हा पोलीस प्रशासन मैदानात उतरते तेव्हा मात्र सरकारची प्रतिमा मलिन झाली आहे. वास्तविक पाहता या सर्व प्रक्रियेमध्ये सखोल चौकशी करणे गरजेचे आहे जर ते राज्याला होत नसेल तर केंद्राकडून त्याची चौकशी व्हायला पाहिजे.

विभागावर अनेकांनी प्रश्न निर्माण केले असतानाही सुबोध जयस्वाल यांचे प्रकरण सुद्धा महाराष्ट्र सरकारने लक्षात ठेवणे गरजेचे आहे. शासनाच्या बेफिकीर धोरणामुळे जनतेचे हाल बेहाल होत असून वसुली दलाली भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या व्यवस्थित चौकशी व्हावी. या सर्व प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण असणाऱ्या रश्मी शुक्ला पासून तर सुबोध जैस्वाल च्या डॉक्युमेंटरी चे सर्व महत्त्वपूर्ण प्रकरण तपासाला पाहिजे.


"भाजपचे आंदोलन सुरूच राहील"
गृहमंत्री जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचे आंदोलन सुरूच राहील महाराष्ट्राची प्रतिमा कधीही मलिन होऊ देणार नाही असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या