येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क करा.

Breaking

6/recent/ticker-posts

जिल्हा प्रशासनाला समन्वयाचे 'बळ', यंत्रणा एकवटली


जिल्हाधिका-यांच्या नेतृत्वात, पोलिस व आरोग्य विभागाने मांडला आलेख


यवतमाळ. 
जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांच्या नेतृत्वात कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा एकवटली असून पोलिस व आरोग्य विभागाने घेतलेल्या पत्र परीषदेत नियोजन, नियंत्रण व समन्वयाचा आलेख मांडण्यात आला.

जिल्ह्यातील परीस्थिती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हाता बाहेर जात असतांनाच जिल्हाधिका-यांच्या अधिनस्थ यंत्रणेमध्ये समन्वय नसल्याच्या कथीत पत्राने खळबळ उडविली  होती. मात्र गुरूवारी जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ, सीव्हिल सर्जन डॉ.तरंग तुषार वारे, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश दुबे, मेडिकल कॉलेज अधिष्ठाता डॉ.मिलींद कांबळे आदींनी पत्रपरीषदेला हजर राहून जिल्हा प्रशासनामध्ये समन्वय असल्याचे दाखवून दिले आहे.


दरम्यान जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्तांना लिहिलेल्या त्या कथीत तक्रारीच्या पत्राची जिल्ह्यासह विभागात चर्चा असतांना समन्वयाच्या 'बळा' ने यंत्रणा एकवटली असल्याचे दिसून येत आहे. मात्र पत्र परीषदेला जि.प.मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ नसण्याच्या विचारलेल्या प्रश्नावर उत्तरादाखल ते सीएमओ कार्यालयाच्या व्हिडीओ कॉन्फरसींग मध्ये असल्याचे सांगण्यात आले.


24 मार्च 2021 पर्यंत 25 हजार 836 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. सरकारी व खासगी कोविड रूग्णालयाच्या 33 कोविड सेंटर मध्ये 2 हजार 411 कोरोना एक्टीव असून मार्च महिन्याअखेर 2 लाख 43 हजार चाचण्या करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना टेस्टींग होत असल्यामुळे पॉझिटीव्ह येण्याचे प्रमाण वाढले आहे. 

कोरोना सह अन्य गंभीर आजार असणा-या मृतकांचे प्रमाण अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील गार्डन हॉल मध्ये 25 मार्चला आयोजित पत्रकार परीषदेत त्यांनी माध्यम प्रतिनिधींना जिल्ह्यातील कोरोना परीस्थितीबाबत अवगत केले.


4 लाख लसींची मागणी केली जाणार 

जिल्ह्यात 16 जानेवारी पासून 5 सेंटर वरून लसीकरणाला सुरूवात झाली. आजच्या घडीला 94 कोविड लसीकरण सेंटर कार्यरत आहेत. 16 खासगी व्हॅक्सीनेशन सेंटर आहे. 1 लाख 9 हजार 440 लसी उपलब्ध झाल्या. आता शासनाकडे 4 लाख लसींची मागणी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. 

सद्य स्थितीत जिल्ह्यात 230 क्रिटीकल रूग्ण आहेत.  आता सब सेंटर सुरू करण्याचे देखील शासनादेश आहेत. त्यामुळे उद्यापासून 50 सब सेंटर मध्ये देखील लसीकरणाला सुरूवात होणार आहे. सद्यस्थीतीत 2 खासगी कोविड तपासणी केंद्र बंद करण्याचा विचार जिल्हा प्रशासन करत असल्याचे जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह म्हणाले.


व्यापा-यांसह अनेकांचा विरोध असल्यामुळे लॉक डाऊन नाही
गेल्या 13  महिन्यातील टेस्टींगच्या तुलनेत 1  महिन्यातील चाचण्यांचे प्रमाण हे अधीक आहे. शासनाकडून 4 हजार 460 टेस्टींगचे टार्गेट असतांना आम्ही प्रत्येक दिवशी 5  हजार टेस्ट करतोय. मध्यंतरी एक दिवस हा आकडा 7  हजारांपर्यंत पोहोचला होता. 


जिल्ह्यातील तालुक्यापैकी यवतमाळ, पुसद, दिग्रस, वणी, महागाव, नेर येथील केसेस चे प्रमाण अधीक आहे. 90 टक्के केसेस या याच नगर परीषदेतील आहेत. त्यातही 60 टक्के केसेस या यवतमाळ मधीलच असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील आकडे वाढत आहे. राज्यातील देखील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या वाढत आहे. 

10 मार्च ते 24 मार्च दरम्यान 25 हजार 836 केसेस आहेत. 1 हजार 62 रूग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत. 2411 एक्टीव्ह पेशंट आहेत.
दरम्यान या महिन्यात रूग्णांची संख्या वाढली असून फेब्रुवारीच्या शेवटीच रूग्ण वाढीचा आकड दिसून आला. 

प्रशासन लॉकडाऊनचा विचार करत होते. मात्र व्यापारी वर्गासह अनेकांचा लॉकडाऊनला विरोध असल्यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले नाही. व्यापारी, दुकानदार आणि अन्य प्रतिष्ठानातील कामगार, कर्मचा-यांनी स्वत: पुढाकार घेत चाचणी केल्यामुळे टेस्टींगची संख्या वाढली असल्याचे जिल्हाधीकारी म्हणाले. 

'आता पर्यंत 583 नागरीकांचा बळी"

चालु महिन्यातच डेथ रेट वाढला असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र मृतकांमध्ये ज्यांना पुर्वी काही समस्या अथवा आजार होता असे रूग्ण पॉझिटीव्ह होवून दगावल्यांची संख्या अधिक आहे. 

अशांचा आकडा हा 394 असून आतापर्यंत 583 नागरीकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यापैकी 244 अन्य मृत्यू हे कोरोनामुळे व अन्य कुठलेही आजार नसलेल्यांचे आहेत. मृतकांमध्ये 326 रूग्ण हे 51  ते 70 या वयोगटातील आहेत. 

90 मृत्यू 41  ते 50 वयोगटातील, 94 मृत्यू 70  ते 80 वयोगटातील , 36 मृत्यू 81 ते 91 या वयोगटातील नागरीकांचे असल्याचे या वेळी सांगण्यात आले. 1 ते 10 वर्षाच्या वयोगटातील 2 व्यक्तींचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. महिलांचे प्रमाण कोरोना मृत्यूमध्ये कमी आहे. 

वाढता मृत्यू दर लक्षात घेता माझे कुटूंब माझी जबाबदारीच्या धर्तीवर मी जबाबदार मोहिम नागरीकांनी स्वंयस्फुर्तीने राबवावी असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले."

लॉकडाऊन का नाही...

जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची आकडेवारी वाढत असतांना इतर जिल्ह्याप्रमाणे यवतमाळ मध्ये लॉकडाऊन करण्यावर प्रशासन विचार का करत नाही, असा सवाल काही नागरीक उपस्थित करत आहेत. 

या पुर्वी कोरोनाची श्रृखंला तोडण्यासाठी आठवड्यातील काही दिवस लॉकडाऊन करण्याचा विचार होत होता. मात्र आता लॉकडाऊन ऐवजी टेस्टींग वाढविण्यावर भर दिला जात आहे.

एसपी डॉ.दिलीप भुजबळ यांची पत्रकार परीषदेतील माहिती


वाळू तस्करी कळीचा मुद्दा
जिल्ह्यातील वाळू, रेती तस्करीचा मुद्दा कळीचा आहे. एकूण रेती घाटांपैकी केवळ 16 रेती घाटांचे लिलाव झाले असून 184 घाटांचे लिलाव बाकी आहे. रेती घाटांना घेवून तालुका स्तरावर नियंत्रण समितीच्या बैठका होत असून त्यांचेही समन्वय आहे. 

सकाळी 6  ते सांयकाळी 6 पर्यंतच रेतीच्या वाहतुकीला परवानगी आहे. शासनाच्या आदेशानुसार संध्याकाळी 6 नंतर लीलाव झालेल्या घाटावर जाण्यास कुणालाही परवानगी नसल्याची एसपी डॉ. दिलीप भुजबळ यांनी स्पष्ट केले.


ते पत्र अर्धशासकीय
जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्तांना लिहिलेले कथीत पत्र तक्रारीचे नाही. ते अर्धशासकीय पत्र आहे. संबंधीत पत्र हे मार्चच्या पहिल्या आठवड्यातील असून कधी कधी प्रशासनातील परीवारामध्ये वरीष्ठ अधिकारी आपल्या अधिनस्थ यंत्रणेच्या एखाद्या घटकावर रागावू शकतात आणि चांगली कामगीरी केली म्हणून शाब्बाशीही देवू शकतात अशा आशयाचे वक्तव्य एसपी भुजबळ यांनी पत्र परीषदेत केले. 

जिल्हाधिकारी यांना असे पत्र लिहिण्याचा अधिकार असल्याचे सांगतानाच प्रशासनातील कुणाकडून तरी पत्र व्हायरल करणे दुर्देवी असल्याचे त्यांनी म्हटले.

75 फिक्स पॉइंट, 55 लाखांचा दंड वसूल
जिल्ह्यात कोरोना पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेशाच्या अनुषंगाने 144 कलमाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जात आहे. यासह मोटार वाहन कायद्याचा भंग केल्यास  देखील कारवाई केली जात असल्याचे एसपी भुजबळ यांनी सांगितले. 

जिल्ह्यात चेक पोस्ट तयार करूनही कारवाई सुरू आहे. 75 ठिकाणी फिक्स पॉइंट निश्चित करून नियम भंग करणा-यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. आता पर्यंत 22 हजार 382 कारवाया करत 55  लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. संमेलन-विवाह प्रसंगासारख्या ठिकाणी गर्दी होऊन संसर्ग वाढू नये म्हणूनही कारवाई केली जात आहे. 

अशा ठिकाणी कारवाई करून 20  लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 173 कंटेटमेंट झोन मध्ये व्यवस्था लावण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाकडे 800 होमगार्ड रिझर्व्ह असून त्यामध्ये 600  पुरूष तर 200  महिला होमगार्डचा समावेश असल्याचे पोलिस अधिक्षक डॉ.दिलीप भुजबळ यांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या