येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क करा.

Breaking

6/recent/ticker-posts

फिरत्या स्टेशनरी दुकानदाराची मुलगी झाली यूपीएससीत यशस्वी


अठरा विश्व दारिद्र असतांनाही केला 15 तास अभ्यास
डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शन आणि मिळाले यश

राजेश खोडके
 नेरपरसोपंत

"नेर शहरातील परिसरामध्ये चक्क स्टेशनरीच्या व्यवसाय गाडीवर करून उदरनिर्वाह करणार्‍या कुटुंबातील काजल मिसळे  हिने युपीएससीमध्ये यशस्वी भरारी घेतली नेरपरसोपंत शहरातील ही पहिली मुलगी आहे कि, जिने अठराविश्व दारिद्र्यावर मात करीत उत्तुंग भरारी घेतल्याने नेर शहरांमध्ये आदर्श निर्माण केला आहे."

माणसाच्या मनामध्ये जिद्द आणि चिकाटी असली तर त्याला यश संपादन करता येते आणि ते यश संपादन करीत असताना स्वतः आत्मविश्वास सुद्धा तेवढाच दांडगा लागतो ,ही किमया केली आहे नेरपरसोपंत शहरांमधील असणाऱ्या काजल भाऊराव मिसळे या मुलीने. नुकत्याच लागलेल्या यूपीएससीच्या निकालात ती यशस्वी झाल्याने नेर शहरांमध्ये यशाची परंपरा कायम राहिली आहे.

शहराच्या चारही बाजूने असणाऱ्या नगरांमध्ये गाडीवर फिरून स्टेशनरीचा व्यवसाय करणारे भावराव मिसळे यांनी आपल्या मुलीला शिकून मोठं करण्याचं स्वप्न बघितलं. आणि ते आज या निमित्ताने पूर्ण झालं. विशेष म्हणजे या सर्व कार्यामध्ये काजलची आई रत्ना मिसळे यांचा सिहाचा वाटा राहिला आहे.

डॉ.हर्षदीप कांबळे यांचे मार्गदर्शन

यवतमाळ जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी डॉ हर्षदीप कांबळे सर असताना त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना एक आशेचा किरण दाखवला त्यानिमित्ताने समता पर्व प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी अनेक युवा युवतींना यश संपादन करण्यासाठी मार्गदर्शन केले.काजल मिसळेला सुद्धा डॉ. हर्षदीप कांबळे यांचे मार्गदर्शन मिळाल्याने तिने हे यश संपादन करीत असल्याची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशनने खूप काही दिले
गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी नांदेड शहरांमध्ये सुरू असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशनचे दीपक कदम यांनी या विद्यार्थ्यांना यूपीएससी च्या तयारी करण्यास संदर्भामध्ये मार्गदर्शन केले आहे. या सोबत देवयानी खोब्रागडे,ओमकार ठाकूर, दिल राज यांनी सुद्धा काजलला मार्गदर्शन करून यश संपादन करण्यासाठी सहकार्य केले आहे.
माझे आदर्श डॉ. हर्षदीप कांबळे सर असून जनसेवेसाठी मी सातत्याने सक्रिय राहणार आहे संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत करिता मी पंधरा तास
(मुुलांमध्ये आपलं आयुष्य समर्पित करणारं जगावेगळं दाम्पत्य..)
 
अभ्यास केला असून त्यादृष्टीने मला मार्गदर्शन मिळाले आहे. वाचन विद्यार्थ्यांनी वेळेवर करणे गरजेचे आहे,त्याप्रमाणे माझे नियोजन मी केले आहे.
काजळ मिसळे, नेर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या