येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क करा.

Breaking

6/recent/ticker-posts

बदलती समीकरणे आणि महाराष्ट्रातील राजकारण

maharashtra-politics

 
हल्ली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमूलाग्र बदल होत आहे. खरं तर राजकीय क्षेत्र ही लोकशाहीला पूरक की मारक अशा दोन विचारसरण्या सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय झाल्या आहेत. 


खरे तर भारतीय लोकशाहीचा डोलारा हा भारतीय संविधानावर अवलंबून आहे.  लोकप्रतिनिधी जसा सक्रिय प्रामाणिक आणि लोकाभिमुख काम करणारा असला की, तो सर्वसामान्य माणसाच्या असणाऱ्या समस्या चूटकीने सोडवतो.भारतीय संविधानाच्या शक्तीवर आस्था ठेवून मंत्रिमंडळ यामधील एक जबाबदार मंत्री म्हणून जेव्हा शपथ घेतो आणि तो जर भ्रष्टाचारी, व्यभिचारी आणि समस्याभिमुख न राहता तो समस्या झाला तर शेवटी न्याय कुणाकडे मागायचा? 


वास्तविक पाहता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रगल्भता आता हळूहळू संपायला लागली आहे. एक काळ होता शब्दाला किंमत होती आज शब्द हे फिरवण्याचे आणि खोटे बोलण्याची हत्यार म्हणून वापरले जाते. कारण वास्तव आणि सत्य या दोन गोष्टी समजून घेण्यात पलीकडेही सत्ताधाऱ्यांची मजल गेली आहे. एकीकडे भन्नाट स्वप्न घेऊन जगणारे आणि हम करे सो कायदा अशा राजकीय माणसाला आता लोकांच्या समस्या सोडवण्याऐवजी स्वतःच्या पोट भरण्याचे अफलातून प्रकार सुरू करत आहेत.


कोण कोणासाठी काम करते याकडे कुणाचे लक्ष नाही, परंतु पक्ष आणि सत्ता हे दोन शेवटपर्यंत टिकायला पाहिजे याकरिता लोकप्रतिनिधी का असा प्रश्न सर्वसामान्य माणसांमध्ये विचारला जात आहे.  महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये  एक मराठी माणसाची परंपरा लागली आहे.यशवंतराव चव्हाणांनी उपपंतप्रधानाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर महाराष्ट्राची ओळख निर्माण केली होती.जरी वारण्याच्या काठावर आयुष्य तालमीत गेलं असलं तरी यशवंतरावांच्या आठवणी जाग्या होतात. 


त्यात तालमीत वाढलेला शरद पवार नावाचा व्यक्तिमत्व आजही महाराष्ट्राची धुरा खांद्यावर घेऊन जगत आहे.याला कारण विश्वासार्हता आहे. राजकारणामध्ये असल की हळूहळू नेतृत्वाचा उदय आणि येणारी सामाण्य माणसाची भूमिका सुद्धा तेवढेची महत्त्वाची असते, आणि ती महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. नेतृत्व जर प्रामाणिक असेल तर मग लोक त्याच्या वरती विश्वास करतात आज महाराष्ट्राच्या राजकारणाची विश्‍वासार्हता कायम आहे, परंतु हळूहळू आता सवंगड्यांनी काय करावं आणि राजकारणाच्या पलीकडे ही एक विश्वास आहे. 


यापलीकडे जीवन जगणाऱ्या माणसाच्या कल्पनाही काही वेगळ्या आहेत. म्हणूनच आज कुणाकडे बघायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु राज्याच्या राजकारणात होणारे बदल हे मराठी माणसाला जिवारी लागणारे आहे. कारण येणारा काळ हा प्रत्येक माणसाचा आव्हानात्मक काळ आहे तसाही महाराष्ट्र आशेने बघत आहे. एक काळ महाराष्ट्रामध्ये अनेक आमूलाग्र बदल होण्याची संधी निर्माण झाली होती, 


परंतु शेवटपर्यंत या संधीला साथ न देता एक वेगळ्या वळणावर ती महाराष्ट्राचे राजकारण जात आहे. कुठे कौटुंबिक कलह  आता विधानसभेत पोहोचतोय तर दुसरीकडे बलात्कार आणि व्यभिचाराची प्रकरणे सुद्धा लोकांच्या तोंडी आलेले आहेत. त्यामुळे येता येणारा काळ हा कसा राहील हे निश्चितपणे सांगता येत नाही, परंतु सर्वसामान्य माणसाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लोकांनी लोकांसाठी निर्माण केली लोकशाही आता ही तयार झाली पाहिजे. अशी आशा अपेक्षा ठेवूनच महाराष्ट्रातील मराठी माणसाची आगेकूच असताना केंद्रस्तरावर होणारे बदल हे मराठी माणसाला शेवटी मातीत घालणारे राहणार की तारणारे राहणार हेच पाहण्याची वेळ आता राहिली आहे.


आता महाराष्ट्राला एका वेगळ्या राजनीतिक आणि वैचारिक नेतृत्वाची अत्यंत गरज आहे. वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या राजकारणामध्ये आता होणारे आमुलाग्र बदल हे प्रत्येक माणसाला एका वेगळ्या वाटेवर नेऊन ठेवणारे आहेत. बदलत्या समीकरणांमध्ये आपण कोठे आहोत. याची कल्पना सुद्धा आपणास असणेही तेवढेच गरजेचे आहे.


त्यामुळे राज्यातील राजकारणाची आगेकूच कुणीकडे आहे हे सांगता येत नाही परंतु ज्या महाराष्ट्राने एक विचारधारा संपूर्ण भारताला दिली त्या महाराष्ट्राची ओळख आता जागतिक पातळीवर वेगळ्या नजरेतून व्हायला नको, तर ते विकासात्मक दृष्टिकोनातून असायला पाहिजे संयमी आणि चिंतनशील व्यक्तिमत्वाने नेतृत्व करत असताना कुठले निर्णय घ्यावेत आणि त्या निर्णयावर ती होणारा परिणाम हा महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाच्या मस्तकावर लिहिला जाईल का याची चिंतन करणे गरजेचे आहे. 


टीका हा राजकारणातला सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो केला हि पाहिजे. कारण त्याशिवाय आपल्याला राजकारण करता येत नाही परंतु राजकारणामध्ये वैचारिकता आणि इतर सर्वच चिंतनात्मक दृष्टीकोनातून गरज असणे तेवढेच गरजेचे आहे. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये मराठी माणूस आपल्याच पायावर ती धोंडा घेऊन पडणार की काय अशी वेळ आलेली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या