येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क करा.

Breaking

6/recent/ticker-posts

एमपीएससी परीक्षेच्या तारखेत गोंधळाने विद्यार्थ्यांचे खच्चीकरण - देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis


तारीख ऐन तोंडावर आली असतांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड आर्थिक व मानसिक खच्चीकरण झाले आहे. शासकीय नोकरी साठी जीवाचे रान करणाऱ्या विद्यार्थ्यांची ही चेष्टा आहे असे ते म्हणाले.


शासन व प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे ही वेळ आली आहे अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.


राजकीय पक्षांच्या बैठक, रॅली व आंदोलने मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. इतर अनेक गोष्टींना राज्य सरकारने परवानगी दिली असतांना या परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलणे अत्यंत ढिसाळ कारभाराचा नमुना आहे. 


त्यासाठी देण्यात आलेले कोरोनाचे कारण अतिशय तकलादू आहे. राज्य शासन नियोजन करण्यात कमी पडले. किंवा त्यांची तशी मानसिकताच नाही अशी टीका फडणवीसांनी केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या