येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क करा.

Breaking

6/recent/ticker-posts

आठवडाभरात होईल 'ही' परीक्षा. मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांना धीर

uddhav thackeray


गतवर्षी MPSC एमपीएससी परीक्षांची तारीख पुढे ढकलण्यात आली होती, तेव्हा मी बोललो होतो, यापुढे परीक्षा पुढे ढकलण्यात येणार नाहीत, आताची १४ मार्चची परीक्षा काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे, मात्र विद्यार्थ्यांना यावेळी जास्त वाट बघावी लागणार नाही. 


परीक्षेची तारीख ८ दिवसांच्या कालावधीतील असेल, येत्या आठवडाभरात ही परिक्षा होईल अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


आता तारीख जाहीर होईल तेव्हा ती कोणत्याही कारणाने पुढे ढकलली जाणार नाही अशी शाश्वती मुख्यामंत्र्यांनी दिली. १४ मार्चला ही परीक्षा होणार होती, मग परीक्षा पुढे करण्यात आली आणि पुढे करण्यात आले तरी किती दिवस करण्यात येणार आहे याबाबत संभ्रम आहे, परंतु येत्या आठवडभरात ही परीक्षा घेण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.


अनेक विद्यार्थी या परीक्षेसाठी कित्येक महिने/वर्ष अभ्यास करतात त्यांच्या भावनेशी सहमत आहे. १४ तारखेची परीक्षा पुढे केलेली आहे ती महिना-दोन महिने, तीन महिन्यासाठी नाही तर केवळ काही दिवसांसाठी करण्यात आली आहे. 


मी स्वतः मुख्य सचिवांना आणि एमपीएससी च्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की या तारखांबद्दल जो काही घोळ झालेला आहे तो लवकर संपवा आणि तारीख उद्यापर्यंत जाहीर करा असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे. 


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळताच राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला होता. परीक्षा नियोजित दिवशीच घेण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी होती.


अनेक विद्यार्थी शासकीय नोकरी साठी प्रचंड मेहनत घेत असतात. परीक्षांच्या वेळापत्रकात बदल झाल्यास किंवा त्या पुढे ढकलण्यात आल्यास विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक व आर्थिक तणावास बळी पडावे लागते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या