येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क करा.

Breaking

6/recent/ticker-posts

फिटे अंधाराचे जाळे

फिटे अंधाराचे जाळे
 

महिलांच्या मोकळ्या श्वासातील गोष्टी खरंतर चूल आणि मूल सांभाळण्याच्या कल्पना देऊन जगणाऱ्या भारतातील तमाम प्राचीन ग्रंथामध्ये महिलांना स्वातंत्र्य किती होत याबाबतची अनन्भिन्नता आजही कायम आहे. 


परंतु मातीवरती रेघोट्या ओडीत महिलांना शिक्षणाच्या दालनामध्ये रणरागिनी सारख्या उभे करीत महापुरुषांनी दिलेली नवसंजीवनी म्हणजे शिक्षण घेऊन आज राज्याच्या राजकीय नव्हे तर सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांच्या आघाड्या कायम आहे. चुलीपुरती मर्यादित असणारी बुद्धिमत्ता आता हळूहळू माणसांच्या दालनात जाऊन बसली आहे ही कल्पनाच करू शकत नाही. 


आपल आयुष्य एवढ सुंदर असते म्हणून या भन्नाट कल्पनेने आज गृहिणी सावित्रीचा पदर हातामध्ये पकडीत आयुष्याच मार्गक्रमण करायला लागल्या आहे. राज्याच्या राजकारणामध्ये जी महिला डोक्यावरचा पदर खाली पडू देत नव्हती ती या देशाची राष्ट्रपती झाली, तर वडिलांचा वारसा सांभाळणाऱ्या आणि वानर सेनेचा वसा घेऊन जगणाऱ्या इंदिरा गांधींना पंतप्रधान पद उपभोगायला मिळालं तर भारतातील ही संकल्पना सर्वस्व देऊन जाते. 


आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीवर मी अहोरात्र प्रेम करते अशा प्रकारचा दृढ आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या सोनिया गांधींनी पंतप्रधानांचे पद नाकारत मनमोहन सिंग यांच्या जवळ खुर्ची दिली. एवढेच नाही तर सातत्याने डोक्यावरती कुंकवाचा आत्मविश्वास ठेवीत राज्याच्या राजकारणामधील  स्त्रीया आज स्वतः सर्वस्व अर्पण करायला तयार आहेत. 


गल्लीपासून दिल्लीपर्यंत महिलांची असणारी यशस्वी रेलचेल या सर्वांचा नजरेमध्ये येत आहे. वास्तविक पाहता राजकीय क्षेत्रामध्ये असणारी वाहव्वा आणि आकाशामध्ये झेप घेणाऱ्या कल्पना चावला यांचेही कौतुक तेवढेच कमीच. त्यामुळे शतकानुशतके बंधनात अडकलेल्या महिलांना आयुष्य समर्पित करीत असताना आपल्याला नेमकं काय करायचं याबाबतची पुसटशी कल्पना जरी दिली तरी त्यांच्यासाठी विकासाचं आकाश मोकळ असतं. 


म्हणूनच आयुष्याच्या सर्व समर्पक गोष्टी करताना नवसंजीवनी आणि चेतना प्रत्येक स्त्रियांच्या मनामध्ये सातत्याने जागरूक असतात आणि त्यामध्ये आता राजकीय क्षेत्रांमध्ये सुद्धा स्त्रियांची रेलचेल सुरू झाली आहे .अशाच अनेक यशस्वी गोष्टी या माध्यमातून समोर येणार आहे.  


वडिलांचे बोट पकडून पंतप्रधान झालेली इंदिरा असो की पतीच्या खांद्याला खांदा लावून देशाचं राष्ट्रपतीपद घेणाऱ्या प्रतिभाताई पाटील असो की यवतमाळच्या आझाद मैदानावर बसलेला पुरणपोळीचा आजीचा स्वयंपाक लंडनला पोहोचला. 

मैदानामध्ये लढणाऱ्या वैदर्भीय मातीतील प्रत्येक महिलांचा इतिहास असो तो एक दिवस वैचारिक दृष्टीकोनातून सक्षम होईल आणि या देशाला नवीन संकल्पना देऊन जाईल त्यामुळे तुमच्या अंधारवाटा आता मिटल्या पाहिजे आणि प्रकाशाचा सूर्य हातामध्ये घेऊन तुमच्या जगण्याच्या संकल्पना साकारल्या पाहिजेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या