येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क करा.

Breaking

6/recent/ticker-posts

लोकप्रतिनिधी आणि आंदोलन

delhi farmer protest


सध्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची नोंद आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये होणार हे दगडावरील शिलालेखावरील कोरीव रेष आहे. 


त्यामुळे याचा विचार आता राजकीय दृष्टिकोनातून करण्यापेक्षा येणाऱ्या पिढीच्या सामाजिक दृष्टिकोनातून करणे तेवढेच गरजेचे आहे. वास्तविक पाहता दिल्लीमध्ये सुरू असणारे आंदोलन हे किती महत्त्वाचे आहेत आणि ते का केले जाते याचे अनेक प्रश्न सध्या सर्वांनाच पडलेले आहे. 


महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाला आणि विशेष करून शेतीशी नाळ जुडलेल्या प्रत्येक शेतकर्‍यांना प्रश्न पडला आहे. वास्तविक पाहता पंजाब आणि हरियाणा हे दोनच राज्य शेतीशी निगडित आहे का हे तेवढेच महत्त्वाचे आहे. परंतु या मधील महत्त्वाची गोष्ट की आहे की, भारतीय संस्कृती ही शेतीप्रधान संस्कृती आहे. 


या संस्कृतीतील प्रत्येक माणसाची नाळ या मातीशी जुळलेली आहे त्यामुळे मातीसाठी होणारा संघर्ष हा कोणी थांबवायचा आणि त्या संघर्षाला विराम कोणी द्यायचा हे तेवढच महत्त्वाच आहे. इसवी 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली,उद्देश फक्त व्यापार होता आणि आपणा वरती 150 वर्षे राज्य करून गेली. हे कसे शक्य आहे त्याचे कारण म्हणजे की, भारतीय माणसाची मानसिकता जी आहे ती कशी आहे यावरून अवलंबून असते. 


farmer protest


अमेरिकेचे उत्तम उदाहरण आहे जगाला हलवणारा डोनाल्ड ट्रम्प एका सेकंदामध्ये अमेरीकेतील लोकांनी बाजूला केला आणि जगाला प्रत्यक्ष लोकशाहीचे उत्तम उदाहरण दिले. याचे कारण की, जेव्हा देशातील जनता जागृत असते तेव्हा कुठल्याच औषधाची गरज बदलासाठी आवश्यकता नसते. 


ती प्रत्येकाच्या हातामध्ये असते ती मतपेटीतून सुद्धा आपल्याला बदलवता येते,म्हणून भारतीय संविधानाने मतदानाचा अधिकार हा बहुमूल्य अधिकार प्रत्येकाला बहाल केला आहे. त्यामुळे आपण कुठलाही निर्णय घेताना चुकलो तरी सावरू शकतो परंतु मतपेटीतला निर्णय जर चुकला तर सावरू शकणार नाही हा संभाव्य धोका इथल्या महापुरुषांनी तुम्हाला सांगितला आहे. 


असे असतानाही देशातील तमाम शेतकऱ्यांना रस्त्यावर येऊन आपली आर्तहाक सरकार पर्यंत पोहोचविण्याचा महत्तम कार्य करावे लागते. आणि त्याकरिता सरकारची भूमिका दुहेरी आहे यापेक्षा दुर्दैव जगामध्ये कुठेच नाही. जगामध्ये असणाऱ्या देशांमध्ये सुद्धा सर्वात महत्वाच्या गोष्टी तेवढ्याच आपल्याला मनाला स्पर्श करून जातात. उदाहरणार्थ जगातला सर्वात श्रीमंत शिक्षक हा जपानमध्ये आहे, 


ज्या देशाचा राष्ट्रपती किंवा पंतप्रधान जरी रस्त्याने जात असेल तर तो शिक्षकाला नतमस्तक होतो. कारण त्याला माहित आहे येणारी पिढी हाच घडवणारा घटक आहे. तर अमेरिकेमधील असणारी प्रत्यक्ष लोकशाही सुद्धा प्रत्येक माणसाला दर्जा देते. चुकला तर त्याला खाली खेचते, ही तेवढाच महत्त्वाच आहे. असे असतानाही आपल्या देशामध्ये असणाऱ्या शेतकऱ्याला आपल्या मागण्या साठी इतके दिवस बॉर्डर वरती बसावं लागतं हे दुर्दैव तेवढच महत्त्वाच आहे. त्यामुळे 20 सप्टेंबर 2020 रोजी कृषी क्षेत्राच्या संबंधात मंजूर केलेले कायदे आधी समजून घेणे गरजेचे आहे. 


शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य विधेयक 2020, शेतकरी किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक 2020, आणि अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती विधेयक 2020 असे तीनही कायदे शेतकऱ्यांना मंजूर नाहीत त्यामुळे शेतकरी सप्टेंबरपासून हे आंदोलन करत आहेत. या आंदोलनाची धग संसदेच्या दारापर्यंत पोहोचली परंतु अजून पर्यंत सरकारला जाग मात्र आल्याचे दिसत नाही. त्यामुळे हा देश आम्ही विकू देणार नाही आणि तो भांडवलदारांच्या घशात जाऊ देणार नाही अशा प्रकारची आर्त हाक ज्या हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांनी दाखवली ती इतर राज्यातील शेतकऱ्यांनी का दाखवली नाहि हे मात्र या कायद्याला समजून घेणे तेवढेच गरजेचे आहे. 


नव्या कृषी कायद्यामध्ये काय आहे आणि शेतकऱ्यांच्या मागण्या कोणत्या आहेत हेही तेवढेच महत्त्वाचे आहे त्यामुळे एम एस पी मोडकळीस येईल का ही भीती शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण आहे. त्यामुळे एपीएमसीच्या बाहेर विक्री झाल्यास बाजार शुल्क न मिळाल्याने राज्याचं नुकसान होईल आणि बाजार समिती हद्दपार होईल अशी भीती निर्माण झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा देणे तेवढेच गरजेचे आहे. 


farmer protest delhi


परंतु राजकीय इच्छाशक्ती असल्यास शिवाय कुठल्याही प्रकारे कुणालाही काहीही मिळत नाही हे आपल्याला तेवढंच महत्त्वाचं समजून घ्यावे लागेल. आज पंजाब मधील शेतकरी इतके आक्रमक का झाले याचे कारण त्यांची भूमिका ही फक्त राज्यापुरती मर्यादित नाही तर देशातल्या तमाम शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. देशातील एकूण एपीएमसी मंडळीच्या तब्बल 33 टक्के मंडळी एका पंजाब मध्ये आहे. 


त्यामुळे ही गोष्ट साहजिक आहे परंतु याबाबत सुद्धा प्रत्येकाने आता तो विचार केला पाहिजे. या देशांत व दिल्लीमध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात झालेला आंदोलन करून अण्णा हजारेनी पूर्ण देशांमध्ये पेटवले होते. हे आपण आपल्या डोळ्यांनी बघितल आहे. परंतु ज्याकरिता आज अण्णांची भूमिका या आंदोलनाप्रति काय आहे हे मात्र माध्यमांमध्ये दिसत नाही म्हणजे आपण शेतकऱ्याचा संदर्भांमध्ये गप्प का? हे तेवढेच महत्त्वाचे आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे काय? त्या संपतील? असे शेतकऱ्यांना का वाटतं याचं याचे चिंतन करणे तेवढेच गरजेचे आहे. 


त्यामुळे महाराष्ट्रातील 300 बाजार समित्या आजही कायम आहेत. परंतु मराठी माणूस आंदोलनांमध्ये सक्रिय झालेला नाही, गावपातळीवर जर आंदोलन झालं तरच ते शक्य आहे अन्यथा आपण कुठे आहोत ही मात्र कळायला मार्ग राहणार नाहीत. खरं तर शेतकऱ्यांची आजचा हाक ऐकण्यासाठी मानसिकता गरजेची आहे. त्यामुळे या मानसिकतेचा चिंतन तेवढेच होणे गरजेचे आहे भांडवलदारांच्या हातामध्ये शेती गेली म्हणजे आपला आयुष्य गेलं, आपला आयुष्य गेलं म्हणजे आपली पिढी गेली, आपली पिढी गेली म्हणजे आपल्याला गुलामी आली, 


आणि आपल्याला गुलामी आली की आपण संपलो. ही मानसिकता  पंजाब आणि हरियाणा ज्या शेतकऱ्यांनी हेरली आणि म्हणूनच गर्भवती महिलांनी पासून तर आबाल वृद्ध पर्यंत असणाऱ्या महिलांनी आपली भूमिका सीमावर्ती भागामध्ये जाऊनच नाही तर दिल्लीच्या तख्तावर जाऊन म्हणून ठेवली आहे त्याकरिता ती आर्त हाक आता समजून घेणे गरजेचे आहे. 


गावांमधील माणसांनी गावातच करावे आंदोलन ही भूमिका आता शेतकरी आंदोलनाची झाली आहे पंजाब मधील 300 शेतकरी संघटना हरियाणा पश्चिम उत्तर प्रदेश आणि देशातील इतर सर्व संघटना जवळपास चारशे संघटना या यामध्ये सहभागी आहेत. सुमारे 1 लाख शेतकरी दिल्लीच्या सीमेवरती विविध ठिकाणी आंदोलन करून आपला निषेध नोंदवत आहेत कधी ट्रॅक्टर ट्रक उभे केले जातात कधी तंबू रोवले जातात. तर कधी सांस्कृतिक दृष्टिकोनातून जनजागृती केली जाते. त्यामुळे आता राजकीय इच्छाशक्ती तेवढेच गरजेचे आहे.


शेतकऱ्यांच्या भविष्याविषयी भारतातील महापुरुषांनी केलेले भाष्य तेवढेच महत्त्वाचे आहे. ज्या देशातील शेती सुरक्षित राहणार नाही त्या देशातील शेतकरी सुरक्षित राहणार नाही हे भाग्ये तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण शेतीच्या संदर्भामध्ये असणारी  सरकारची उदासीन भूमिका आज सर्वांना समजणे गरजेचे आहे .


मग ते राज्यातील सरकार असो की केंद्रातील सरकार असून शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये उचित असणारे पाऊल उचलले गेले पाहिजे. एकदा भांडवलदारांनी तुमच्या घरांमध्ये पाऊल ठेवलं की तुमचं घर कब्जा केला जाते आणि हळूहळू तुमच्या मेंदुवर अधिराज्य केले जाते ही भीती निर्माण करणारी यंत्रणा आता तुम्हाला उधळून टाकायची आहे. येणारा काळ हा संघर्षाचा काळ आहे. 


आणि विशेष म्हणजे आंदोलनाचा काळ म्हणून त्याची जागतिक पातळीवर नोंद होईल. परंतु शेतीच्या संदर्भामध्ये आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये राजकीय व्यक्तिमत्त्वामध्ये असणारी जी उणीव आहे ती उणीव भरून निघायला पाहिजे. अन्यथा आपण संपू आणि आपली पिढी सुद्धा संपणार आहे हे मात्र तेवढेच सत्य राहील!


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या