येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क करा.

Breaking

6/recent/ticker-posts

देवेंद्रजी ,जरा इकडे सुद्धा लक्ष द्याआपल्या राजकीय स्वार्थासाठी सुशांत सिंग प्रकरण जरूर उचला पण महाराष्ट्राची,महाराष्ट्र पोलिसांची आपण बदनामी तर करीत नाही ह्या कडे सुद्धा लक्ष द्या.... 
पालघर साधू प्रकरण जरूर उचला पण त्या घटनेनंतर यापले प्रिय व भाजप शासित उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांचे राज्यात म्हणजे उत्तर प्रदेश मध्ये होणाऱ्या साधू आणि पुजारी हत्येच्या आठ प्रकरणाकडे दुर्लक्ष करू नका..... 

कोरोना काळात विविध देशांनी कशी मदत नागरिकांना केली ह्याची मांडणी जरूर करा.पण ही मदत देशांनी आणि तेथील राष्ट्रअध्यक्षांनी केली हे विसरू नका.महाराष्ट्र देशातच येतो आणि एखाद्या राज्यात भाजपची सत्ता नसेल तर तो भाग भारत देशात येत नाही असे नाही.ह्या भागातील नागरिकांची जेवढी जबाबदारी राज्याची आहे तेवढीच ती केंद्राची आहे हे देखील लक्षात ठेवा.तेव्हा देशात केंद्राला सर्वात जास्त कर स्वरूपात महसूल देणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेसाठी सुद्धा पॅकेज ची मागणी आपण माननीय पातप्रधानांकडे नक्की कराच. 

पूजा प्रकरण जरूर उचला.कारण विरोधक म्हणून तथ्य असो नसो आपण राजकीय मायलेज घेणे अपेक्षित आहे.
पण मग महिलांवरील अत्याचारात भाजप शासित उत्तर प्रदेश हे 66 टक्के वाढीसह देशात पहिल्या क्रमांकावर आले आहेत.उत्तर प्रदेश मध्ये भाजप सरकार आहे मग त्याबाबत कोणी का बोलत  नाही.तसेच मध्यप्रदेश मधील बलात्कारित अल्पवयीन मुलीची धिंड आणि उत्तर प्रदेश मधील महिला अत्याचाऱ्याच्या घटना,कर्नाटक मधील नोकरीचे अमिश दाखवून केलेला एका मुलीवर केलेला अत्याचारा विषयी सुद्धा नक्की बोला.... 

वाझे, जिलेटीन कांड्या प्रकारणे जरूर उचला.महाराष्ट्र सरकारची छबी कसेही करून खराब करण्याचा प्रयत्न करणे तुमचे कामच आहे.पण हे देखील लक्षात ठेवा की सामान्य जनतेला ह्या प्रकरणाशी काही एक संबंध नाही.सामान्य जनतेशी संबंधित महागाई,पेट्रोल डीझेल आणि गॅस च्या किमती ह्या विषयी सुद्धा थोडे बोला हो..... 
संजय राठोड,अनिल देशमुख आणि अनिल परब ह्यांचे नैतिकतेच्या आधारावर नक्की राजीनामे मागा.पण आपण मुख्यमंत्री असताना सप्रमाण आरोप झालेल्या पंकजाताई,चंद्रकांत दादा,विनोद तावडे, जमीन प्रकरणात तुम्ही स्वत,प्रकाश मेहता आणि इतर 12 भाजप मंत्र्यांना तुम्ही राजीनामा न देता क्लीन चिट कशा दिल्या व तेव्हा ही नैतिकता कोठे होती हे देखील आम्हाला थोडे समजवा.... 

केंद्र शासन आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी नेहमी चांगले बोलाच.मग त्यात महाराष्ट्राची माती झाली तरी चालेल. पण जरा केंद्र शासनाने गेल्या 70 वर्षात उभारलेले महत्वाचे 2 लक्ष कोटी रुपयांचे सार्वजनिक उद्योग विकायला का काढले आहेत.गेल्या 70 वर्षात कधी विकावे लागले नाहीत असे सरकारी उद्योग आपल्याला का विकावे लागत आहेत? आहे त्याविषयी सुद्धा थोडे बोला हो.. 

वाझे प्रकरणात 20 जिलेटीन कांड्यांची चौकशी करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या NIA च्या कामाविषयी तारीफ नक्कीच करा.पण मग पुलावमा अटॅक बाबतीतील असा हल्ला होऊ शकतो ह्या आधी मिळालेल्या महितीकडे ह्याच एन.आय. ए ने का दुर्लक्ष केले? ह्या अटॅक मध्ये 300 किलो आरडीएक्स कसे घटना स्थळी पोहोचले?भारत सरकार व गोपनीय विभाग ह्या बाबतीत कसे अपयशी ठरले?ह्या पुलवामा अटॅक व सैनिक मृत्यू प्रकरणात भारत सरकार अप्रत्यक्ष जबाबदार नाही का?ह्या विषयी सुद्धा थोडे बोला.... 

महाराष्ट्र सरकार च्या कोरोना काळात केलेल्या कामावर टीका नक्कीच करा.पण महाराष्ट्रातून निम्याहून कमी व रुग्ण असलेल्या भाजप शासित राज्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात जास्ती लसी उपलब्ध करून देणाऱ्या केंद्र शासनावर थोडी तर टीका करा.आपल्या देशातील 125 कोटी नागरिकांना कोरोना लस देण्याआधी आपण 70 देशांना का कोरोना लस निर्यात करतोय?त्या विषयी सुद्धा थोडे बोला हो .... 

शंभर कोटी वसुली,दोन कोटी,पन्नास कोटी कोणी कोणाला मागितले ह्याची जरूर चर्चा करा.पण तेव्हाच राफेल व्यवहारात कमिशन दिले हे सांगणाऱ्या फ्रांस सरकारच्या म्हणण्या कडे देखील थोडे लक्ष द्या.हे कमिशन कोणी घेतले ह्याची चौकशीची मागणी आज पत्रकार परिषद घेऊन मा देवेंद्रजी तुम्ही कराच.आणि नक्की आपल्या आक्रमक शैलीने केंद्र शासनाच्या जाब विचारा... 

देवेंद्रजी ह्या बाबत सुद्धा थोडे बोलाच....आम्ही वाट बघतोय.कारण दुर्दैवाने बहुतांश मेडिया सुद्धा आपण आणि भाजप धार्जिण्या बातम्यांचा दाखवतात.महत्वाचे जनसामान्यांचे मुद्दे, केंद्र शासनाच्या चुका आजकाल द्रुकश्राव्य माध्यमांवर दिसतच नाही.तेव्हा तुम्हीच ह्या बाबत बोला.माननीय देवेंद्र फडणवीस हे तत्वनिष्ठ आहेत.चूका स्वपक्षातील लोकांनी केल्या तरी ते सोडणार नाहीत हे जनतेला दिसू द्या. 
वाट बघतोय ......मा.देवेंद्रजी तुम्ही बोलाच.
पराग पिंगळे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या