येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क करा.

Breaking

6/recent/ticker-posts

अखेर शिवसेनेने बाजी मारली पालकमंत्री संदिपान भुमरे


यवतमाळ प्रतिनिधी
"कित्येक दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्रिपद खाली होते, त्यामुळे त्या पदावर ती कुणाची वर्णी लागणार याची चर्चा मात्र राज्यभर सुरू होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हा जिल्हा सुटणार का याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू असतानाच अखेर शिवसेनेने बाजी मारली."
 पैठण जिल्हा औरंगाबाद येथील असणारे राज्याचे रोजगार व फलोत्पादन मंत्री संदिपानराव आसाराम भुमरे यांना यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जाहीर होताच शिवसेनेमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. शेवटी शिवसेनेने यवतमाळ जिल्ह्याचा गड कायम ठेवल्याचे चित्र दिसून आले.

मराठवाड्यामध्ये एका साखर कारखान्यामध्ये कामगार ते मंत्री असा पालकमंत्री यांचा प्रवास असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन चालणाऱ्या या लोकप्रतिनिधीला यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भेटल्यानंतर शिवसेनेमध्ये अत्यंत आनंदाची लाट पसरली आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये अर्थ व बांधकाम सभापती पदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत एक शिवसैनिक म्हणून त्यांनी केलेले काम मराठवाड्यामध्ये परिचित आहे. एक काम करणारा मंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे.

 अखेर शिवसेनेने बाजी मारली

यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर पालकमंत्री पद रिक्त झाले होते, त्यामुळे विदर्भामध्ये आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये अखेर शिवसेनेचा गड कायम ठेवला. शेवटी शिवसेनेचाच पालकमंत्री मिळाल्याने परत शिवसेनेची संघटन शक्ती मजबूत होईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केल्या जातोय.

एक शिवसैनिक म्हणुन जिल्ह्याला बळ मिळाले
पक्षातील सहकारी असणारे संदीप अनंद्राव भुमरे हे एक शिवसैनिक म्हणून उत्कृष्ट कार्यकर्ते आहेत. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्याला मिळालेले पालकमंत्रिपद आम्हासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे विशेष म्हणजे शिवसैनिकांसाठी ती बाब महत्त्वाची असून सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्याकरिता परत एका नव्या जोमाने कामाला सुरुवात होईल जिल्ह्याच्या एकूण विकासात्मक दृष्टिकोनातून आणि कोरोनाच्या या महाभयानक महामारीतून बाहेर येण्यासाठी पालकमंत्री या पदाची जबाबदारी देण्यात आलेल्या भुमरे त्यांच्याकडून बरेच काही शिकता  येईल आहे. मी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतरच यवतमाळचे पालकमंत्री पद घुमरे यांना देण्यात आले.
खा.भावना गवळी,यवतमाळ
विकासात्मक कामाकडे विशेष लक्ष दिले जाईल
जिल्ह्याच्या विकासात मकामा कडे विशेष लक्ष दिले जाणार आहे म्हणजे शिवसेनेचे असणारे सक्रीय कार्यकर्ते आणि तळागाळातला माणूस यवतमाळ जिल्ह्याला पालकमंत्री मिळाला त्यामुळे जिल्ह्याच्या विकासात्मक दृष्टिकोनातून होणारे सर्व कामे मार्गी लागतील
पराग पिंगळे, जिल्हाप्रमुख शिवसेना

सच्चा शिवसैनिकाला मान
शिवसेनेच्या सच्च्या सैनिकाला यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळालेले आहे श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे पासून असलेल्या एका कार्यकर्त्याला यवतमाळ जिल्ह्याची पुरावे मिळाल्यानंतर विकासात्मक दृष्टिकोनातून अनेक कामे मार्गी लागतील शिवसेना स्टाईल ने होणारे काम शेवटपर्यंत तसेच होईल आज जिल्ह्यामध्ये जी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर मात करण्यासाठी पालकमंत्री महोदय सातत्याने सक्रिय राहतील असा आमचा विश्वास आहे 
संतोष ढवळे, शिवसैनिक यवतमाळ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या