येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क करा.

Breaking

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र दीनी शिवसेनेची चपराक

यावतमाल:
गत एक वर्षांपासून आपल्या देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेनुसारच दुसऱ्या लाटेने सुद्धा जनजीवन विस्कळीत झाले आहे.कोरोनाचे दुसऱ्या लाटेतील परिवर्तित झालेला विषाणू अधिक संसर्गजन्य असल्याने रुग्ण संख्या अचानक वाढली आहे व त्यामुळे रुग्णालयात बेड व ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे.ग्रामीण भागातील अनेक रुग्ण हे उशिरा रुग्णालयात येत असल्याने त्यांची प्रकृती गंभीर होत आहे त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.


अशातच सर्व जिल्ह्यातील गंभीर रुग्ण यवतमाळ येथे उपचाराला येत असल्याने अनेक रुग्ण यवतमाळ येथे कोविड आजाराने मृत्युमुखी पडतात.कोरोनाचे नियमानुसार त्यांचे अंतिम संस्कार हे यवतमाळ नगरपालिका करते.मे 2020 ते आज पर्यन्त एकूण 1222 कोरोना मृतकांवर नगर पालिका यवतमाळने अंतिम संस्कार केले आहेत.हे अंतिम संस्कार करणाऱ्या सर्व कोरोना योध्यांची दखल घेणे आवश्यक होतेच.माजी मंत्री आमदार संजय राठोड यांना ही बाब प्रकर्षाने जाणवली.त्या अनुषंगाने आज महाराष्ट्र दीना निमित्य ह्या कोरोना योध्यांचे छोटेखानी कौतुक सोहळा आमदार संजय राठोड यांचे जनसंपर्क कार्यालयात घेण्यात आला. 
नगर पालिकेचे डॉ विजय अग्रवाल,नगर पालिका कार्यालय अधीक्षक अजयसिंह गहरवाल,कनिष्ठ लिपिक अमोल पाटील,कनिष्ठ लिपिक भूषण कोटंबे, कंत्राटी कर्मचारी अब्दुल जब्बार अब्दुल सत्तार,शेख अहमद शेख गुलाम,शेख अलिम शेख इकबाल,आरिफ खान बशीर खान व केशव गायकवाड यांच्या या निरपेक्ष व अमूल्य कार्याचे कौतुक शाल,श्रीफळ,पुष्पहार,कौतुक पत्र व भेटवस्तू देऊन माजीमंत्री आमदार संजय राठोड,जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदा पवार,नगराध्यक्ष कांचन चौधरी,नगर परिषद प्रभारी मुख्याधिकारी हर्षल गायकवाड व शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांचे हस्ते करण्यात आले.याप्रसंगी शेखर राठोड,विकास क्षीरसागर,प्रशांत कोळकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. 

अंतिम संस्कार करतांना प्रत्येक धर्माचे रूढी व परंपरे अनुसारे आम्ही अंतिम संस्कार करतो.ह्या कार्यात गेल्या वर्षात अनेक सामाजिक संघटनांनी आम्हाला मदत केली.पार्थिव देहाचे पावित्र्य कायम ठेवून होताहोत्सव मृतकाच्या आप्तेष्ठांना आम्ही अंतिम संस्कार स्थळी बोलावतो.दुसऱ्या दिवशी मृतकाची रक्षा व अस्थी सुद्धा आम्ही नातेवाईकांना सुपूर्द करतो असे ह्या कार्यात वाहून घेतलेल्या डॉ विजय अग्रवाल यांनी सांगितले.ह्या कार्यात कुठेही कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास आम्ही ह्या कार्यात तत्पर राहू असे माजी मंत्री आमदार संजय राठोड यांनी डॉ विजय अग्रवाल ह्यांना आश्वस्थ केले. 
पराग पिंगळे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या