येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क करा.

Breaking

6/recent/ticker-posts

व्यावसायिकांना मदत तर ऑक्सीजन कॉन्संट्रेटरसह आवश्यक सामग्रीचे वाटप , अंत्यसंस्कार करणा - या कोरोना योद्धयांचा सत्कार


 

यवतमाळ दि .५ जुन : देशात कोरोनामुळे कठीण परिस्थिती निर्माण झालेली असतांना वाढदिवस गरजूंची मदत करून साजरा करावा असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते . या आवाहनाला प्रतिसाद देत किसान कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार व नगरसेवक जावेद अन्सारी यांच्या पुढाकाराने यवतमाळ येथे काँग्रेस पक्षातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात होते . कोरोनामुळे ज्या शेतकरी परिवारात का व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटूंबाला पेरणीसाठी बियाणे वितरित करण्यात आले . तसेच लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसलेल्या गरजू सलुन व्यावसायिकांना धान्यवाटप करण्यात आले .
ज्या कोविड सेंटर मध्ये ऑक्सीजनची गरज आहे तिथे १६ ऑक्सीजन कॉन्संट्रेटर या निमित्ताने देण्यात आले . कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्याचे अतुल्य कार्य ज्यांनी केले त्या २३ कोरोना योद्ध्यांचा या छोटेखानी कार्यक्रमात प्रत्येकी ७ हजार रूपये सन्मान राशी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . स्व.वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या कोरोना रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक सामग्रीचे वाटप करण्यात आले .

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री माणिकराव ठाकरे होते . प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची उपस्थिती होती . यावेळी काँग्रेसचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष आ.डॉ.वजाहत मिर्झ , माजी मंत्री वसंतराव पुरके , बाळासाहेब मांगुळकर , प्रविण देशमुख , अशोकराव बोबडे , राहूल ठाकरे , अरूण राऊत , जावेद परवेज अन्सारी , चंदू चौधरी , दिनेश गोगटकर , बबलू देशमुख , छोटू पावडे , विजय मोघे , वैशाली सवई , किरण कुमरे , अशोक भुतडा , दर्शना इंगोले , जितेश नवाडे , छोटू सवई , अरविंद वाढोणकर , ललित जैन , पल्लवी रामटेके , जाफर खान , साहेबराव पवार , राजेंद्र हेडवे , मिनाक्षी सावळकर , मिलिंद रामटेके यांची उपस्थिती होती .
 कोरोना प्रोटोकॉलचे पालन करून अत्यंत मर्यादित लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेमंतकुमार कांबळे , प्रा.विठ्ठल आडे , सै.रफिक बाबू , संजय डंभारे , अरूण नक्षणे , संजय नक्षणे , मारोतराव जाधव , पंजाबराव घोडसरे , वासुदेव राठोड , सुधीर सोनटक्के , लालसिंग अजमेरकर यांच्यासह यवतमाळ जिल्हा कॉंग्रेस व किसान काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या