येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क करा.

Breaking

6/recent/ticker-posts

सेवाभावी प्रा.आनंद ठमके यांना निरोपदाभा (सुभाष परोपटे)
पब्लिक पोस्ट ब्युरो
दाभा पहूर  येथील शिक्षण विकास मंडळ, एम सी व्ही सी, कनिष्ठ महाविद्यालय, महात्मा फुले मागासवर्गीय वस्तीगृह दाभा (पहुर)च्या वतीने प्रा.आनंद ठमके यांना सेवानिवृत्ती निमित्त संस्थेचे सचिव प्रा.वसंत परोपटे यांच्या अध्यक्ष खाली संस्थेचे अध्यक्ष डॉ.आंनद हजारे, देविदास  परोपटे, महादेव शेंडे, सुभाष परोपटे, मुख्याध्यापक महेंद्र ठाकूर,पर्यवेक्षक चंद्रकांत हुड, इंजि. प्रज्वलित ठमके, प्रा.उन्नती ठमके यांच्या अतिती खाली सत्कार करून निरोप देण्यात आला. प्रा. आनंद ठमके यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देण्यात आली, तर ठमके सरांच्या अर्धांगिनी स्नेहलता ठमके यांना साडीचोळी भेटवस्तू देऊन गौरविण्यात आलं.
 प्राचार्य ठाकूर प्रा. आनंद मेहरे,रवी ढगे,मंगला झंझाड, विशाखा तलवारे, अंकुश वाकडे, प्रज्वलित ठमके यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. विशेष म्हणजे प्रा.आनंद ठमके यांनी संस्थेला 51 हजार रुपयाची देणगी देऊन कृतार्थता व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. दीपक वाघ, प्रास्ताविक चंद्रकांत हूड, व आभार गजानन उघडे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या